विभागीय क्रीडा स्पर्धेत लासूर स्टेशनच्या विद्यार्थ्यांचे यश

Foto
गंगापूर, (प्रतिनिधी): लासूर स्टेशन, छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय क्रीडा संकुलात क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या विभागीय क्रीडा स्पर्धांमध्ये लासूर स्टेशनच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले.

जुडो कराटे या क्रीडा प्रकारात अमृता निगोटे, भूमिका बनसोड, गायत्री कहहऱ्हाळे, नूतन जगताप, हर्षदा तिव्हाडे यांनी विभागीय स्तरावर प्रवेश मिळवला. तर काव्य दाभाडे, वैष्णवी शेजूळ, जान्हवी निकम, अबोली शेजूळ, श्रावणी हडके, रोहित शेजूळ, साईराज सोनवणे, साईराज शेजूळ, तनिष्क दिवेकर यांनीही सहभाग नोंदवला. 

या विद्यार्थ्यांना मास्टर रिद्धी सोमवंशी, मास्टर अमृता निगोटे, सेन्साई विजय टकले यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल अभिनंदन होत आहे.